गांधींनी सत्याची व्याख्या केलेली नाही, पण सत्याचा शोध मात्र घेतला आहे!
गांधी आणि कबीर, असे वाटते की, ते एकमेकांना पूरक आहेत. जेव्हा कबीर जातो, तेव्हा गांधी येतात, तर जेव्हा गांधी जातात, तेव्हा कबीर येतो. दोघेही सत्याचे शोधक आहेत. कबीराने त्याचा शोध घेतला व ते व्यक्तीवर सोडून दिले. त्याने कोणत्याही संघटित धर्माचा आधार घेतला नाही. खरे तर त्याने इस्लाम आणि हिंदू धर्मातल्या अनेक गोष्टींवर कडक ताशेरे झोडले आहेत. तर गांधी तसे नव्हते.......